पुरंदर, १४ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील खळद येथील सेंट जोसेफ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सिस्टर व उपमुख्याध्यापिका यांच्याविरोधात सासवड येथे लहान मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांचे पालक प्रदीप अंकुश जगताप यांनी दिली आहे
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रदीप अंकुश जगताप रा. ताथेवाडी ता.पुरंदर जि. पुणे. यांची मुलगी येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तीची व तीच्यासह अन्य पाल्यांच्या पालकांनी शाळेची वाढीव फी न दिल्याबद्दल त्यांना आरोपी सिस्टर व्हिक्टोरिया रा. खळद सेंट जोसेफ स्कूल, मुख्याध्यापक गीतांजली व्यवहारे रा. जेजुरी, उपमुख्याध्यापक अनुराधा पोरे रा. शिवरी यांनी दि.२३/९/२०१९ रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजलेच्या दरम्यान खळद सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल येथे परीक्षेस न बसवता बंदिस्त खोलीत कोंडून त्यांना दमदाटी केली.
यावेळी आरोपींनी फिर्यादी यांचे मुलासह इतर ५५ ते ६० मुले व तितक्याच मुलींना वाढीव फी भरली नाही म्हणून त्यांना परीक्षा हॉलमध्ये न बसविता इतर वर्गात बसवून त्यांना फी बाबत तगादा लावत होत्या, त्यामुळे मुले रडकुंडीला आली होती व नंतर पालकांना पाहून मुलांना तेथून बाहेर काढून व्हरांड्यात फरशीवर बसून त्यांची कुचंबना केली. सन २०१५-१६ पासून स्कुलची मनमानी फि न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातील मुलांमध्ये वेगळे उभे करणे, फी भरण्यास मोठ मोठ्याने सांगणे, दरडावणे, तसेच परीक्षेस बसू न देता वर्गात वेगळे बंद करून ठेवून लहान मुलांना मानसिक त्रास दिला आहे. याबाबतची फिर्याद दिली आहे.
अशा प्रकारची तक्रार देण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आली असून याबाबत भादवि कलंम. ३४२, ५०६, ३४ सह अल्पवयीन बाल न्याय ( मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा पुढील तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस.हाके हे करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे