माढा, ३० सप्टेंबर २०२०: माढा शहरातील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेबाहेर सापडले तीन तोळ्याचे सोने मुख्याध्यापिका मंदाकिनी मिसाळ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्वरित ते खरे असल्याची शाहनिशा केली व बँकेतील कर्मचाऱ्यांना सांगितले.
मुख्याध्यापिका मंदाकिनी मिसाळ या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माढा येथे आले असता बँकेतील काम आटपून बाहेर आल्या असता दोन तोळ्याचे लॉकेट व दोन अंगठ्या सर्व मिळून तीन तोळे सोने मिसाळ यांना सापडले. त्यांनी इमानदारीने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. सदर रक्कम जवळपास पावणेदोन लाख रुपये किमतीचे असून एक आदर्श शिक्षक म्हणून मंदाकिनी मिसाळ यांचे संपूर्ण तालुका व जिल्हाभर कौतुक होत आहे.
शिक्षकांचे नुसते पुस्तकी ज्ञान व मार्गदर्शन करायचे नसते तर तसे स्वतः कृतीतून वागून दाखवून द्यायचे असते. असे मुख्याध्यापिका मंदाकिनी मिसाळ यांनी यावेळी सांगितले. मिसाळ यांचा दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांच्या सन्मान सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील