राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं केली चार सदस्यीय समितीची नेमणूक

मुंबई, १६ सप्टेंबर २०२० : राज्यात सिटीस्कॅन चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागानं चार सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. या समितीला सात दिवसात अहवाल सादर करायचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भातला शासन निर्णयदेखील काल जारी करण्यात आला.

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन चाचणीची देखील आवश्यकता भासते.
खासगी रुग्णालयं तसंच सिटीस्कॅन केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं या चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं.

चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती खासगी रुग्णालयं आणि एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन अहवाल सादर करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा