मुंबई, २१ ऑगस्ट २०२०: १५ जुलैपासून जैन समाजाचा पर्युषण उत्सव सुरू झाला आहे. या कालावधीत जैन मंदिर खुले ठेवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती. याबाबत न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मुंबईतील तीन ठिकाणी जैन मंदिरं उघडण्याची परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरं व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. अनलॉक प्रक्रिया दरम्यान राज्य सरकारने काही अटी शर्तींवर मंदिरं सुरू ठेवण्याबाबत निर्णय दिला होता. कोरोनामुळे अनेक सण असेच साधेपणाने साजरी करण्यात आले आहे. जैन सन पर्युषण उत्सव सुरू झाला आहे. याबाबतच जैन बांधवांनी न्यायालयात मंदिरं उघडे ठेवण्याबाबत याचिका दाखल केली होती. एक आठवड्यानंतर अखेर न्यायालयाने मुंबईतील तीन मंदिरे उघडे ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे.
न्यायालयानं मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरं प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस मंदिरं उघडण्यात येणार आहे. २२ व २३ ऑगस्टला मंदिरं खुली राहणार आहेत. मंदिरं खुली केल्यानंतर केंद्र सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचं पालन करण्यात यावं, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी