दोन मुली झाल्याने पतीने पत्नीवर केले कोयत्याने वार

13

यवतमाळ, २४ ऑगस्ट २०२२: ही घटना यवतमाळ जिल्ह्यामधील बंगला इथं घडली आहे. लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती शिवाजी चव्हाण नेहमीच पत्नी जयश्रीसोबत वाद घालत असे व मारहाण करायचा. दरम्यान अशाच वादातून त्याने तिला सुरवातीला नायलॉन दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

पण पत्नीने पतीच्या हल्ल्याला हुसकावून लावत विरोध केला. अखेर पतीने थेट कोयताच हातात घेतला आणि पत्नीवर वार करण्यास सूरवात केली. या मध्ये पत्नीच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जयश्री या रक्तबंबाळ झाल्या आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पती स्वतः हे करुन स्वतः पोलीस स्थानक गाठलं आणि आपण काय केलंय, याची कबुलीही पोलिसांसमोर दिली आहे. जयश्रीला उपचारा साठी नातेवाईकानी नांदेड येथे घेऊन गेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन लोखंडी कोयता व नायलॅन दोरी हे सर्व साहित्य जप्त केले आहे.

आरोपी विरुद्ध कलम ३०७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवाजी चव्हाण याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी दिली असून पोलिसांकडून कसून चौकशी सूरु असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर