गणपती बाप्पाची “ती” मूर्ती ठरतेय सोशल मीडियाचे आकर्षण

12

पुणे, दि.२८एप्रिल २०२०: सध्या राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे. त्यात गणपती व्यवसायही एक आहे.

लॉकडाऊनमुळे गणपती व्यावसायिक जरी अडचणीत आला असला तरी , आहे तेवढया भांडवलात गणपतीची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एक मुर्तीकाराने एक आकर्षक गणेश मूर्ती तयार केली असून ती सध्या सर्वांचे आकर्षण बनत आहे.

उभ्या तयार केलेल्या गणेशाच्या हातात त्रिशूळ आहे, आणि ते त्रिशूळ कोरोनाला मारताना दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात पुढे काय होईल हे काळच ठरवेल . परंतू गणेशोत्सवात मात्र कोरोनाविषयीच्या देखाव्यांचे आणि मूर्त्यांचे आकर्षण राहणार हे नक्की.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा