खून करून फरार झालेल्या जावयाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुरंदर, दि. १० ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील रहिवासी किसन काळे यांनी जावई सुरेश भोसले यांचा आठ ऑगस्ट रोजी चाकूने भोसकून खून केला होता. खून करून फरारी झालेल्या या जावयाच्या मुसक्या गुन्हे अन्वेषण विभागाने चोवीस तासात आवळल्या.

आज (दि.१०) रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत पुणे ते सोलापूर रोडने गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून खुनातील फरार आरोपी सुरेश सदाशिव भोसले (वय ४०) याला सापळा लावून जेरबंद केले. जेजुरी नजीक नाझरे सुपे येथे सासऱ्याचा खून करून आरोपी सुरेश सदाशिव भोसले  हा  मिरवडी ता. दौंड जि. पुणे येथे आला असल्याचे समजल्याने त्यास मौजे मिरवडी ता. दौंड येथे सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पुढील तपासकामी व वैद्यकीय तपासणी करून जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी  भोसले याने आपली बायको नांदायला येत नाही म्हणून चिडून जाऊन भांडण करून पत्नीचे वडील म्हणजेच त्याचे सासरे किसन देशा काळे (वय ६०) वर्षे यास चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून पळून गेला होता. याबाबतची तक्रार किसन काळे यांच्या मुलाने जेजुरी पोलीस स्टेशनला दिली आहे.

ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सफौ.दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी,चापोहवा राजापूरे,पोना विजय कांचन ,पोशि धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके  यांनी केली आहे .

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा