‘द केरला स्टोरी’ चे पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाक्यात कलेक्शन.

5

मुंबई ६ मे २०२३: ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे ७.५ कोटींचा समाधानकारक व्यवसाय केला आहे. चित्रपट विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट वीकेंडमध्ये अजुन चांगले कलेक्शन करू शकतो. हा चित्रपट २०२३ चा पाचवा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. वादग्रस्त विषयामुळे अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या सर्व गदारोळात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवतोय.

यावर्षी प्रदर्शित झालेल्या फक्त पाच हिंदी चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ ने ५५ कोटी रुपयांसह इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली. तर सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट १५.८१ कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणबीर कपूर स्टारर ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट १५.७३ कोटी कमाईसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजय देवगणचा ‘भोला’ ११.२० कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता ‘द केरला स्टोरी’ देखील ७.५ कोटींसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटा ने यावर्षीच्या अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी च्या ‘सेल्फी’ २.५५ कोटी, कार्तिक आर्यन-क्रिती सेनन च्या ‘शहजादा’ ६ कोटी आणि ‘द कश्मीर फाइल्स’ ३.५ कोटी या चित्रपटांना ओपनिंग डे कलेक्शनला मध्ये मागे टाकले आहे.

रिलीजपूर्वी सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला हिरवा कंदील देताना या चित्रपटातील वादग्रस्त १० सीन्स हटवण्याचे आदेश दिले होते. या चित्रपटाचे कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचे धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसे सामील केले जाते हे सांगणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट आहे. चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अदा शर्मासह या चित्रपटात योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा