कल्याणच्या मटका किंगचा मारेकरी पोलीसांच्या ताब्यात

कल्याण, ४ ऑगस्ट २०२०: कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाउंड शेजारी मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर १ ऑगस्ट रोजी गोळीबार झाला होता आणि त्या गोळीबारात जिग्नेश ठक्करचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीसांनी या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि तीन दिवसाच्या कालावधीतच पोलीसांनी या मारेकऱ्यांना शोधून काढलं.

जिग्नेश ठक्करला गोळी झाडणाऱ्या मारेकऱ्याचे नाव दुलगज उर्फ जपान असे आहे. त्यास पोलीसांनी अहमदाबाद येथून ताब्यात घेतले आहे. याता पुढील कारवाईसाठी आता या मारेकऱ्यांस कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. एवढ्या कमी वेळेत या प्रकारणाचा छडा लावल्यामुळे सर्व स्थरांवरून कौतुक केले जात आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने तपास करून आरोपीला अटक केल्याबद्दल ठाणे पोलीस उपयुक्त दीपक देवराज यांनी कौतुक करत पथकाला पाच हजरांचे बक्षीस जाहीर केले आहे.

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्करवर कल्याण आणि उल्हासनगर पोलिस स्टेशन मध्ये मटका आणि रम्मी कल्ब चालवण्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. जिग्नेश क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील काम करीत होता. धर्मेश आणि जिग्नेश यांचे तसे फारसे चांगले संबंध नव्हते त्यामुळे जिग्नेशला रस्त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने धर्मेशने जयपाल व साथीदारांची मदत घेऊन त्याच्यावर गोळीबार केला. पोलीसांना जयपालला पकडण्यात यश आले आहे आणि आता त्याच्याच मदतीने आता उर्वरित मारेकऱ्यांचा शोध घेतला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा