लेबेनॉनची राजधानी बैरुत मोठ्या स्फोटानं हादरली.

लेबेनॉन, ५ ऑगस्ट २०२०: जगात कोरोनाचं संकट संपता संपेना आणि अशातच जगासमोर एक एक नवीन समस्या उद्भवत आहेत.२०२० या वर्षामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आणखी एक घटना घडली आहे जिथे लेबेनॉनची राजधानी , बैरुत येथे अती भयंकर स्फोट झाले आहेत.

या स्फोटांची तीव्रता किती होती हे तुम्हाला खाली दिलेल्या छायाचित्रांवरून दिसून येईल. शहरातील बंदराजवळ झालेल्या या स्फोटामुळे तिथे बरेच नुकसान झाल्याचं दाखवत आहेत.

ही घटना कशी घडली हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाहीे. परंतु झालेल्या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हा अत्यंत भयंकर असा स्फोट असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका स्फोटकांच्या गोदामात हा स्फोट झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावर‌ॆ.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा