जगातील सर्वात लांबचा असा बसचा रूट; लंडन कलकत्ता लंडन

भारतातून लंडनला बसने जाता येत होते?असा जर कोण प्रश्न केला तर याचे उत्तर होते होय ..!

जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा रूट होता तो म्हणजे लंडन कलकत्ता लंडनचा . कलकत्ता ते लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. ही बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण(अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया,
आॅस्ट्रीया,जर्मनी,बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती.

भारतात हि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, बनारस करीत कलकत्ता येथे जात. अल्बर्ट ट्रैव्हलची हि बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुरु झाली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती. तेव्हा त्याचे बस भाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९ रु.) .

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. या लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बाक, पार्टीसाठी प्रवासी रेडिओ / टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते.फॅन, हिटरची सुविधा उपलब्ध होती.
शॉपिंग साठी काही दिवस राखीव होते, त्यात तुम्ही दिल्ली, तेहरान, काबुल,इस्तांबुल ,साल्जबर्ग, विएन्ना येथे खरेदी करु शकत होते.

हि बस जेंव्हा कलकत्त्यात पोहचली तेंव्हा या बसचा ४३ वर्षाय चालक गैरव्ह फिशर जो बरीच वर्ष भारतात रहात होता तो या प्रवासाबाबत सांगताना म्हणाला होता की, हा एक अतिशय अविस्मरणीय व उत्साहित करणारा अनुभव होता. आम्हाला इतक्या लांबच्या प्रवासात कोठेही इंजिनचा प्रॉबल्म आली नाही आणि आम्हाला ब्रेक्स सुध्दा आम्ही एकदा दिल्लीत पोहचल्यावरच अडजेस्ट किंवा तपासावे लागायचे.

त्याने पुढे सांगितले की ते रोज २०० मैलाचा प्रवास करत असत व रात्री एखाद्या शहरात जेवणासाठी व विश्रांतीसाठी ते मुक्काम करत असत. तो पुढे सांगतो की त्यावेळेस असे कित्येक प्रवासी होते ज्यांच्या जवळ फक्त एका बाजूच्या प्रवासाचेच पैसे होते परंतू या प्रवासातील मजा व आनंद बघून त्यांनी परत परतीचा प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अशी ही लंडन कलकत्ता लंडन बस ही १९७३ पर्यंत सुरु होती.

संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा