प्रशासन भवनाची देखभाली वाचून दुरावस्था झाली आहे

बारामती, १० ऑक्टोबर २०२० : बारामती शहराची सध्या राज्याच्या पटलावरील सर्वात विकसनशील शहर म्हणून ओळख आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार तालुक्याच्या विकासासाठी कोणतीही तडजोड करत नाहीत मात्र त्यांनी करून दिलेल्या विकासाची निगा राखण्याची जबाबदारी ही तेथील स्थानिक अधिकाऱ्यांची आहे.तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी उपमुयमंत्र्यांनी सुसज्ज असे प्रशासन भवनाची दिमाखदार इमारत उभारली आहे.मात्र तेथील सध्याचे चित्र हे अत्यंत विदारक असे आहे.यामुळे कामानिमित्त जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची विकासाच्या बाबतीत संभ्रमावस्था होते आहे.

बारामती तालुका म्हणजे विकास अशी ओळख असताना शहरातील प्रशासकीय भवन हे मात्र याला अपवाद ठरत आहे.कारण प्रशासन भवनाच्या समोर असणाऱ्या गार्डन मध्ये सगळीकडे कुसळ व काँग्रेस उगवले आहे तर पार्किंग व इमारतीच्या भिंतींवर सगळीकडे गुटखा ,पान खाऊन सडे मारल्याचे ढिगारे साचले आहेत.स्वच्छता गृहांची स्वच्छता तर केली जाते का नाही असा प्रश्न लोकांना पडतो आहे.येथील बेसिन हे नेहमी तुंबलेले असतात. त्यामुळे इमारतीत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते इमारतीच्या व्हरांड्यात कचऱ्याची पोती ,पाण्याच्या मोकळ्या बाटल्या भरून ठेवल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार हे झाडांच्या बाबतीत किती जागृत आहेत याबाबत सर्व राज्याला ज्ञात आहे.मात्र प्रशासन भवनाच्या इमारतीच्या परिसरातील सर्व रोप् पाण्यावाचून वाळून गेली आहे.या ठिकाणी सर्वत्र ठिबक सिंचनाचे जोड आहेत.मात्र पाणी देण्याचा आळस केला जातो आहे.झाडे वाळून गेल्याने येथील चित्र भकास दिसत आहे.तर इमारतीच्या परिसरात वाढलेल्या झुडपांमुळे येथे डासांचे प्रमाण वाढले आहे.प्रशासन भवनाच्या आवारातील सर्व स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीचा सर्वत्र अंधार पसरलेला असतो.गेट वरील सुरक्षरक्षकांच्या केबिन मधील लाईट देखील अनेक दिवसांपासून बंद आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा