बारामती दि. २९ एप्रिल २०२० : बारामतीतील महात्मा फुले नगर येथील कांचन साहेबराव जगताप व फलटण येथील सुरज दिलीप काकडे या दोघांचा विवाह संपन्न झाला. हा विवाह सोशल डिस्टनसिंग पाळत, केवळ दहा लोकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यामध्ये आजच्या परिस्थितीचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले. नवरी आणि नवरदेव यांनी येथून पुढच्या काळामध्ये या भयाण संकटावर मात करण्याकरता कटिबद्ध राहून शासनाची जी काही धोरणे आहेत, त्या धोरणांची अंमलबजावणी करू अशी शपथ घेतली.
हा सोहळा नियोजनबध्द करण्यासाठी स्थानिक नगरसेविका अनिता दिनेश जगताप , बारामती शहर पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक मा. औदुंबर पाटिल साहेब, तसेच पोलिस उप निरिक्षक मा. शिंदे साहेब ,पोलिस उप निरिक्षक पद्मराज गंपले, पो. कॉनस्टेबल तुषार चव्हाण , पो. हवालदार कोटे यांनी उपस्थितीत राहून मोलाचे सहकार्य केले. या लग्नसोहळ्यासाठी बोध आचार्य म्हणून लाभलेले शुभम अहिवळे यांनी विधि पार पाडला.
महात्मा फुले नगर मधील स्थानिक रहिवाशांनी देखील आपापल्या घरांमध्येच उभे राहून, जोडप्यावर पुष्पवृष्टी करून शुभाशीर्वाद दिले. हा विवाह होण्याकरिता ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी या विवाहासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवून देण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या ठिकाणी प्रवेश करताना सर्व पाहुण्यांना हातांना सॅनिटायझर लावण्यास सांगण्यात आले. हा विवाह सोहळा शासकीय नियमांचे पालन करून पार पडण्यास प्रभाग क्रमांक 19 महात्मा फुले नगर मधील सामाजिक कार्यकर्ते सुशिल अहिवळे, सिद्धार्थ लोंढे, तसेच विकास जगताप, निलेश रणदिवे, प्रशांत लाडे, हर्षद रणदिवे, गौरव जगताप, सौरव चव्हाण, प्रमोद सोनवणे, तुषार कांबळे या महात्मा फुले नगर येथील कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव