महापौरांनी केले अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतुक

पुणे , २६ एप्रिल २०२० : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड , रुबिना अगरवाल पुणे महानगरपालिका अधिकारी , व पोलिस अधिकारी समवेत आज पुण्यातील रेड झोन मध्ये असणाऱ्या पाटील इस्टेट, जुना पुणे मुंबई रोड येथे कोरोना संसर्गामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करण्याऱ्या मनपा कामगारांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.
पुण्यातील घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयातील हि २० कामगार लोकांची टीम असून त्यांच्या सहकार्याने पाटील इस्टेट येथील वसाहत संपूर्ण सील करण्यात आली आहे. तेथे ह्या कामागारांची टीम काम करते आहे . ह्या टीम मध्ये पोलीस डॉक्टर सॅनिटरी इन्स्पेक्टर , सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या वेळी प्रथमतः कामगारांचे कौतुक करत कामगारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे का ? सर्व प्रकारच्या सुरक्षा उपलब्ध होत आहेत का ? अशी विचारपूस केली. आपले काम करत असताना आपल्या स्वतःची काळजी घेत काम करा असेही त्यांनी सांगितले. तसेच परिसरातील परिस्थिती काय आहे हे जाणून घेतले.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा