गोल पोस्ट राष्ट्रीय मेडिकल रिपोर्ट आला आणि नवऱ्यानं लग्नातून पळ काढला ….

मेडिकल रिपोर्ट आला आणि नवऱ्यानं लग्नातून पळ काढला ….

फिरोजाबाद, १५ डिसेंबर २०२०: भारतात लग्नादरम्यान वरात आणि नवर्यांच्या किंवा नवरीच्या घरच्यांचे रूसवे फुगवे काही नविन गोष्ट नाही. नुकतेच उत्तर प्रदेश च्या फिरोजाबाद मधून एक अशीच बातमी समोर आली. जिथं स्वताच्याच लग्नातून नवऱ्यानं पळ काढला.

दोन दिवस आधीच लग्न झाले होते. पण, एका गैरसमजातून नवऱ्यानं लग्न सोडून कुठंतरी निघून गेला आणि शुक्रवारी सर्वांसमोर आला आणि स्वताच्या चुकीचा स्विकार करत आपण एका गैरसमजातून लग्न सोडून गेलो होतो अशी कबुली दिली आणि स्वताची चुक ही मान्य केली. ज्या नंतर थांबलेले लग्नाचे बाकी रीतिरिवाज पार पाडण्यात आले. तर पोलिसांच्या मध्यस्थीमुळं हे लग्न पुन्हा जुळलं.

आणखी एक नवरा झाला पसार….

उत्तर प्रदेश मधे लग्नाच्या दोन दिवसानंतर नवऱ्यानं पळ काढला असून त्याचा शोध चालू आहे. हे प्रकरण पीलीभीत मधील आहे. जिथं नुकतंच एका इसमाचं लग्न झालं होतं आणि दोन दिवसानंतर तो गायब झाला.

ही घटना बिलसंडा पुलिस सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राची आहे. तेथीलच अधिकारी एस एच ओ बिरजा राम यांनी सांगितले कि ८ डिसेंबरला शाहजहांपुर जिल्ह्यात लग्नानंतर,९ डिसेंबर ला नवरा घरातील सर्व नातेवाईकांसोबत घरी आला व नवरी संध्याकाळी आली. ती आल्याच्या दोन दिवसांनी नवरा गायब झाला. ज्या नंतर त्याच्या भावानं पोलीस मधे मिसिंग कंप्लेट केली.

पोलिसांनी नवऱ्याचे कॉल रेकॉर्ड ट्रेस केला आणि त्यांना कळलं की त्यानं घर सोडण्या आगोदर स्थानिक डाॅक्टरला फोन केला होता. ज्या नंतर पोलिसांनी डॉक्टरांशी विचारपूस केली आसता, डाॅक्टरांनी त्या इसमाला सेक्शुअल डिसऑर्डर झाल्याचं सांगितलं. ज्यामुळं पीडित तरूण भरपूर चिंतेत असल्याचं कळालं आसून पोलीस अजून ही त्याचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version