पत्रकारितेच्या पंढरीचे स्थलांतर ?

पुणे १२ ऑगस्ट २०२१; पुणे शहरातील फर्गय़ुसन रस्त्यावर स्थित असलेलं रानडे इन्स्टिट्यूट आज पुन्हा चर्चेत आलं. त्याला कारणही तसंच आहे. रानडे इन्स्टिटूटमधल्या पत्रकारिता विभागाचे स्थलांतर. अतिशय नाजूक आणि वादाच्या विषयात ही इन्स्टिटूट सापडली आहे. या इन्टिटयूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले विद्यापिठात स्थलांतरीत करण्याचा घाट आता घालण्यात आला आहे.

मुळात ही जमिन आहे महादेव रानडे यांची. त्यामुळे यावर हक्क दाखवण्याचा अधिकार कोणालाच नसताना आता अचानक हा विभाग का स्थलांतरीत करण्यात येतोय, असा सवाल संस्थेचे पत्रकारिता विभागातील आजी माजी सदस्य विचारत आहे. ही इमारत इतिहासकालीन असून या इमारतीला इतिहासाचा वारसा आहे. अनेक पत्रकार संपादक येथून घडले असून, आता हे अचानक स्थलांतरांच्या विचाराने सर्वजण संभ्रमात पडले आहे.

या इमारतींवर अनेक बिल्डर यांचा डोळा आहे. अत्यंत मोक्याच्या असलेल्या या जागेची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ४०० कोटी आहे. त्यामुळे साहजिकच बिल्डर ही जागा मिळवण्यासाठी धडपडत आहे. मात्र हा विभाग आम्ही स्थलांतरित होऊ देणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. या संदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की, १४ ऑगस्टला मी रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार असून पत्रकारांसाठी हे एक विद्यापिठ आहे. ते स्थलांतरीत होऊ देणार नाही आणि यात जर कुठलेही राजकिय षडयंत्र असेल तर ते आम्ही उधळून लावू. असे सांगत त्यांनी अनाधिकृतपणे पाठिंबा दर्शवलाय.

पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमरकर यांनी पंधरा दिवसात समिती अभ्यास करुन निर्णय घेईल, असं सांगितलं. पण अचानक हे का घडतय? असा प्रश्न आता निर्माण झालाय. या इमारतीतून पदवी आणि पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाचे कोर्स स्थलांतरित करुन अनुदानित डिप्लोमा मास कॉम हा एकच कोर्स इथे चालू ठेवण्याचा प्रस्ताव आहे. एकुणातच या पंढरीचा वारसा इथे बंद करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. पुन्हा एकदा “विद्या की लक्ष्मी” असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. जे नक्कीच धोकादायक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा