आमदारांनी घेतला कोरोनाग्रस्त गावाच्या परिस्थितीचा आढावा

उस्मानाबाद, दि.९ जून २०२०: उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी गावास भेट देऊन पाहणी केली. तसेच गावातील लोकप्रतीनीधी, प्रमुख व्यक्ति, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावकर्‍यांनी चोख उपाययोजना राबविल्या होत्या. त्यात त्यांना यश ही आले होते. परंतू नवी मुंबई येथून एक व्यक्ति गावाकडे आल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे प्रशासनाकडून गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. गावात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या, सामाजिक अंतर ठेवा, अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा, असे गावकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. गरजू लोकांना त्वरित सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम-३० औषध उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासित केले.

यावेळी रेवणसिद्ध (अण्णा) लामतुरे, जि. प.अर्थ व बांधकाम सभापती दत्ता देवळकर, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जागजीचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरपंच प्रतिभा सरवदे, पोलीस पाटील मनीषा घेवारे, उपसरपंच प्रमोद उंबरे, माजी सरपंच गोपाळ कदम आदींची उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा