मेरठ, दि. २९ मे २०२०: मेरठ मेडिकल कॉलेज मध्ये माकडांनी एक नवीन उद्योग करून ठेवला होता. कोरोना चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले नमुने माकडांनी चक्क पळवून नेले होते. घडलेला हा प्रकार दोन दिवसांपूर्वीचा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामधून हा प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे की, ही माकडे झाडावर बसलेले आहेत व टेस्ट करण्यासाठी घेण्यात आलेले नमुने ते दातांनी चावत होते. यासंदर्भात वैद्यकीय प्राचार्य डॉ. एस के गर्ग यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडेही या प्रकाराचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये काहीही स्पष्ट नाही. त्यांनी ते तपासासाठी मुख्य अधीक्षक डॉ धीरज बल्यान यांना पाठविले.
डॉ. धीरज बालियान यांचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी त्यांना ही माहिती दिली होती. वानराने आरोग्य कर्मचार्यांकडून नमुने हिसकावले. त्यांनी किट फाडली आणि नमुने नष्ट केले. नंतर रुग्णांचे नमुने पुन्हा घेण्यात आले होते.
ही माकडे झाडावर चढली होती त्यांनी हे नमुने जेव्हा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या नमुन्याच्या संपर्कात कोणतीही व्यक्ती आली नव्हती. परंतु, सध्या लोकांमध्ये चर्चा चालू आहे की माकडांना याच्यामुळे संसर्ग होऊ शकेल का? यावर बोलताना ते म्हणाले की सध्या यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. त्यामुळे आता यावर कोणते भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी