भारताने बनविले सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन

नवी दिल्ली(वृत्तसंस्था), दि २१ मे २०२० : भारताने देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनची निर्मिती केली आहे. बिहार राज्यातील मथुरा येथील रेल्वे कारखान्यात हे इंजिन तयार करण्यात आले आहे. सुमारे १२००० हॉर्स पॉवरची क्षमता या इंजिनाची आहे. हे इंजिन पूर्णपणे एसी असून त्याची पहिली चाचणी पंडित दिन दयाळ उपाध्याय जंक्शन भागात घेण्यात आली.

या इंजिन मध्ये मालगाडीचे ११८ डबे खेचून नेण्याची क्षमता आहे. या इंजिने उपाध्याय जंक्शन ते झारखंडपर्यंतचे २७६ किलो मीटरचे अंतर अवघ्या काही तासात पार केले. या इंजिनाची ताशी १२० किमी वेगाने धावण्याची क्षमता आहे. ऑक्टोबर २०१७ पासून या इंजिनाची निर्मिती करण्यात येत होती. हे इंजिन तयार करण्यासाठी १९ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

या रेल्वे इंजिनच्या निर्मितीमुळे भारताकडून आता पुन्हा ऐतिहासिक नोंद करण्यात आली आहे. या अगोदर अशी जास्त हॉर्स पॉवरची निर्मिती करणारे फक्त पाचच देश होते. त्यात आता भारताची भर पडल्याने एक अभिमानाची बाब आहे.त्यातच याची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

या शक्तिशाली इंजिनांची निर्मिती करण्यासाठी बिहारच्या मधेपुरामध्ये एक विशेष प्रकल्प सुरू करण्यात आला असून दरवर्षी १२० इंजिनांची निर्मिती या प्रकल्पात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जवळपास अडीचशे एकरवर हा कारखाना उभारण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा