सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर व मास्क नसलेल्या व्यक्तीवर पालिका करणार दंडात्मक कारवाई

9

बारामती, ११ जानेवारी २०२१: बारामती नगर परिषदेला महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शहरातील नगर परिषद हद्दीतील सर्व दुकानांच्या प्रवेशावर सोमवार दि.११ जानेवारी पासुन “नो मास्क नो एन्ट्री”पोस्टर असणे शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.पोस्टर नसलेल्या दुकानदारावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर पालिका प्रशासन दंडात्मक कडक कारवाई करणार आहे.

बारामती शहरात कोविड रुग्णाचे प्रमाण त्या मानाने कमी झालेले नसुन कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी शासनाने बारामती शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील अनेक ठिकाणचे दुकानदार सूचनांचे पालन करत नाहीत तर काही दुकाने ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतर देखील सुरु असतात. दुकानात प्रवेश करताना ग्राहकाने तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायजर वापरने, व्यावसायिकाने ग्राहकांना सोशल डिस्टन्स अंतर आखून देणे गरजेचे आहे.

यासाठी पालिकेचे प्रत्येक प्रभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील लहान मोठ्या व्यावसायिकांना सूचना दिल्या असुन सोमवार पासुन प्रवेशद्वारावर “नो मास्क नो एन्ट्री” सूचना लिहिलेले बोर्ड द नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई केली जाणार आहे. सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायजर वापरने, तापमान व ऑक्सिजन तपासणी करणे बंधनकारक आहे.

भाजी मंडई, एसटी स्टॅण्ड, व्यापारी संकुले येथे गर्दी होणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर बारामती नगर परिषद दंडात्मक कडक कारवाई करणार आहे. या कारवाईत पोलीस, क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण विभाग कारवाईत सहभागी होणार आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव