उस्मानाबाद दि. २८ एप्रिल २०२०: कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन च्या काळात स्वताहून मदतीचे हात पुढे येत आहेत. काही मोठी माणसे, संस्था, संघ हे सतत नागरिकांच्या सेवेसाठी, त्यांच्या गरजेसाठी पुढे येऊन काम करत आहेत, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.
आता या कार्यात नाम फाउंडेशन देखील पुढे आली आहे. मौजे तांदूळवाडी येथे नाम फाउंडेशन तर्फे गरजू नागरिकांना राशन ची किट देण्यात आली. जेष्ठ अभिनेते नानाजी पाटेकर व मकरंदजी अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या या नाम फाउंडेशन तर्फे ही किट असल्याचे सांगितले. श्री. राजाभाऊ शेळके साहेब, माजलगाव व श्री. पीजी नाना तांबारे, आंदोरा यांचे हे किट मिळवून देण्याकरिता विषेश सहकार्य लाभले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती करड