नवी दिल्ली, २ ऑक्टोबर २०२० राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना संपूर्ण देश त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करीत आहे. यानिमित्त देशभर आणि जगभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. कोविड -१९ चा सर्व देशभर असलेला आजार पाहता अनेक आभासी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी अभिवादन केले.
राष्ट्रीय राजधानीतील महात्मा गांधींची समाधी राजघाट येथे सर्व धर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे बापूंना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी यांची जयंती हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही पाळला जातो.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र हे त्यांचेही स्मरण करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय घाटातील समाधी येथे माजी पंतप्रधानांना पुष्पांजली वाहत अभिवादन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: