एनसीबीला कोणतीही ड्रग्स सापडली नाहीत, नवाब मलिक यांचा दावा

37
मुंबई, 7 ऑक्टोंबर 2021: अलीकडेच, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर पडलेल्या एनसीबीच्या छाप्यावर मोठा दावा समोर आला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी दावा केलाय की भाजप नेते या छाप्यात सहभागी होते.  नवाब मलिक यांनी या छाप्याला बनावट म्हटलंय.   बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला या छाप्यात अटक करण्यात आली आहे.
 नवाब मलिक यांनी एनसीबीच्या क्रूझ छाप्यावर केले प्रश्न उपस्थित
 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.  जिथं त्यांनी दावा केला की, लक्झरी क्रूझ लाइनरवर एनसीबीचे टाकलेले छापे बनावट होते.  या छाप्यात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली.  ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील उपस्थित होता.  आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे.
 नवाब मलिक म्हणाले- क्रूझ लाइनरमधून कोणतीही ड्रग्स सापडली नाहीत.  एनसीबीचा उद्देश केवळ या प्रकरणात अटक केलेल्यांना गोवण्याचा होता.  क्रूझवरील छाप्यात भाजपचा सहभाग असल्याचं नवाब मलिक यांनी सूचित केलंय.  त्यांचा आरोप आहे की भाजप नेते या छाप्यात सहभागी होते.
 NCB च्या कारवाईचे धागेदोरे भाजपशी जोडलेले आहेत का?
 ते म्हणाले- एक व्यक्ती ज्याचं नाव केपीगोस्वी होतं ते आर्यन खानला एनसीबी कार्यालयात आणताना दिसले.  त्याने आर्यनसोबत सेल्फीही क्लिक केला होता.  नंतर, एनसीबीने स्पष्ट केले की ती व्यक्ती एनसीबीचा भाग नाही.  तर NCB ने देखील उत्तर द्यावं की ती व्यक्ती तेथे काय करत होती आणि त्याने आर्यन खानला NCB कार्यालयात का आणलं?
“आणखी एक व्हिडिओ आहे ज्यात मनीष भानुशाली नावाचा एक माणूस अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात आणताना दिसला.  मनीष भानुशाली हे भाजपच्या शाखेचे उपाध्यक्ष आहेत.  भानुशालीच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर, पीएम मोदी, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत  फोटो पाहिले जाऊ शकतात.
 मनीष भानुशाली नवाब मलिक यांच्या आरोपावर काय म्हणाले?
मनीष भानुशाली (ज्यांना मंत्री नवाब मलिक यांनी भाजप कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे) पत्रकार परिषदेत म्हणाले- “मला माहिती मिळाली होती की क्रूझ जहाजावर ड्रग पार्टी होत आहे.  त्याचा आपल्या देशातील तरुणांवर परिणाम होत होता, त्यामुळं जो कोणी यात दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे.  त्यामुळे ड्रग्स थांबण्यास मदत होऊ शकते.
 “या आधारावर आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.  जर ही माहिती बरोबर असेल तर  नक्कीच कारवाई करेल असे त्यांनी सांगितले.  मग ऑपरेशन झाले.  साक्षीदार म्हणून, आम्हाला सही करण्यासाठी एनसीबी कार्यालयात बोलावले गेले.  आम्ही आरोपींना एनसीबी कार्यालयात आणत नव्हतो.  उलट आम्ही त्याच्यासोबत NCB कार्यालयात जात होतो.  केबी गोस्वी माझे मित्र आहेत आणि तेही माझ्याबरोबर होते.  सध्या आरोपी 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत आहेत.  आम्ही मुंबईला परत जाऊ आणि एनसीबीसमोर निवेदन नोंदवू. “
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे