पुणे, २९ ऑगस्ट २०२२: ज्याप्रमाणे काँग्रेस विरुद्ध भाजप हे पारंपरिक युद्ध आहे, त्याप्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी ही लढाईदेखील जोरदार सुरु आहे. यात वादावर प्रतिवाद हे आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी एक वक्तव्य केलं. त्यात त्यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खादी एक स्त्रोत बनू शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले होते. त्याचवेळी अहमदाबाद येथे चरख्यावर सूत कताई करतानाचा फोटो त्यांचा प्रसिद्ध झाला होता.
यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. त्यात त्यांनी बोलताना सांगितलं की, पंतप्रधानांच्या युक्ती आणि कृती कधीच सारख्या नसतात. यंदा पंतप्रधान मोदी यांनी हर घर तिरंगा या मोहिमेची सुरुवात केली. ज्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने घरी तिरंगा फडकवा. हर घर तिरंगा या मोहिमेसाठी सुती, खादी किंवा लोकरीचे तिरंगा फडकवावे, असं सांगितलं होतं. पण यावर राहुल गांधी यांनी यावरुन मोदींवर टीकास्त्र सोडलं. देशासाठी खादी आणि राष्ट्रध्वजासाठी चिनी आणि पॉलिस्टरचे कापड. यावरुन असं दिसून येतं की मोदी यांचे शब्द आणि कृती कधीच समान नसतात, असंही राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर सांगितलं. मात्र काही लोकांनी प्लास्टिक किंवा इतर गोष्टींचे झेंडे फडकावले होते. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष केले होते.
वास्तविक राहुल गांधी कायमच मोदींवर निशाणा साधण्यासाठी उत्सुक असतात, असं दिसून आलं आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटरवर कायम मोदींविरुद्धचे ट्विट पडत असतात. नुकतंच राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरत सांगितलं होतं की, उत्तर प्रदेशात आता मोफत सरकारी रेशन (धान्य) बंद केल्यामुळे गरीब जनता आता अन्न-धान्याला मुकणार आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. ज्यामुळे मोदी सरकार वादात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण मोदी सरकार प्रत्येक योजनेबरोबर कुठलातरी पर्याय जनतेसमोर ठेवत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे कदाचित काँग्रेस सरकारमधील सदस्यदेखील राहुल गांधी यांना गंभीरपणे घेत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांना पक्ष नेता नको असंही तिथल्या सदस्यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: तृप्ती पारसनीस