सलमान खान च्या नव्या चित्रपटाचा नवीन लूक आला प्रेक्षकांच्या समोर

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२ : सलमान खान त्याच्या स्टाईलने आणि हटके स्वॅगने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. सलमान खानचा लवकरच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा सलमान खानचा अजून एक नवीन लूक समोर आला आहे.

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याचा हा नवीन लूक शेअर केला आहे. हा लुक चित्रपटातील त्याच्या पूर्वीचा लुक ‘भाई’ चा होता आणि आत्ताचा नवीन लूक ‘जान’ चा आहे, ‘आगामी किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून सलमान खान पुन्हा एकदा मोठया पडद्यावर येणार आहे. ह्या लुक मध्ये सलमान खान नेहमीप्रमाणेच खूप डॅशिंग दिसत आहे. फोटोमध्ये सलमानचा स्वॅग पाहण्यासारखा आहे, हा लुक पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यासोबत अभिनेत्री शहनाज गिल देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, त्याचबरोबर साउथ सुपरस्टार वेंकटेश दघुपती आणि मेघा पॉवर स्टार रामचरण या चित्रपटात दिसणार आहेत.

‘किसी का भाई किसी की जान’ हा एक ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचा निर्माता सलमान खान आहे, हा सिनेमा हिंदी, तेलगू , तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होणार आहे. तर ३० डिसेंबर २०२२ ला हा सिनेमा संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा