नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे, राहुल गांधी पाठोपाठ संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई, २३ मे २०२३ -: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर जोरदार निशाणा साधला. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले पाहिजे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करण्यास राऊत यांनी विरोध दर्शवला आहे.

रविवारी २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. आता राहुल गांधी यांच्या फोटो पाठवा संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. राष्ट्रपतींना डावलून नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. देशात लोकशाहीचा मुडदा पडला जात असल्याचा घणाघातही खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २०१४ पासून राष्ट्रपतीपदावरील व्यक्तींचा वारंवार अवमान केला जात आहे. राष्ट्रपतीपदावर अशाच व्यक्तींना बसविले की जे काही प्रश्न विचारणार नाहीत. आता संसद भवनाचे उद्धघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न होणे, हा त्यांचा मोठा अवमान आहे. आता राष्ट्रपतींना निवडणुकीसाठी बाहेर काढले जाणार असल्याचे विधान त्यांनी केले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकाला आमचा पाठिंबा आहे असे सांगत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवरही निशाणा साधला.

विरोधी आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२४ मध्ये पराभव होणार आहे. यासाठी विरोध एकत्र आले आहे. मोदींचा पराभव झाल्यानंतर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा पुन्हा एकदा आरोप करत, जयंत पाटील यांच्या झालेल्या चौकशीत आमचा पाटील यांना पाठिंबा असल्याचे राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा