पुणे, दि. २४ जुलै २०२० : पुण्यातील कोविड -१९ ची बिघडती परिस्थिती पाहता प्रशासनाने दहा दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले होते. यामध्ये पाच दिवस कडक लॉक डाऊन असणार होते तर पुढील काही दिवस हे थोड्याफार सवलती देत लॉक डाऊन सुरू राहणार होते. काल २३ जुलै रोजी रात्री बारानंतर या लॉक डाऊन चा कालावधी संपला. दरम्यान प्रशासनाने आज पासून काय नवीन नियम राहतील याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. तर जाणून घेऊयात आजपासून कोणत्या गोष्टी सुरू राहतील व कोणत्या गोष्टी बंद राहतील.
केंद्र सरकार कडून लावण्यात आलेले प्रतिबंध कायम राहतील त्यानुसार पुढील प्रमाणे अटी व नियम असतील.
१) महानगरपलिका हद्दीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/ सेवा वगळता रात्री ०९.०० ते सकाळी ०५,०० वाजेपर्यंत घराबाहेर जाता येणार नाही.
२) ६५ वयोगटापेक्षा अधिक वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा कमी वय असलेली मुले यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणी शिवाय घराबाहेर जाता येणार नाही.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणत्या गोष्टी बंद राहतील व कोणत्या गोष्टी चालू राहतील
१) महापालिकेच्या हद्दीमध्ये वैद्यकीय/आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरिता, या सेवा वगळता/ पुरवठा वगळता अन्य व्यक्ती यांना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रा (Containment Zone) मध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे.
२) प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (Containment Zone) मध्ये दुध आणि भाजीपाला तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे की स्वयंपाकाचा गॅस, इ. जीवनावश्यक वस्तु औषध विक्री दुकाने / अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय / व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे.
३) मनपाची अत्यावश्यक सेवा देणारी सर्व प्रकारची वाहने जसे पाण्याचे टैंकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी व त्यावरील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी / अधिकारी यांना प्रतिबंधात क्षेत्रामध्ये केंव्हाही प्रवेश करता येईल. त्याकरिता कोणत्याही पासची आवश्यकता राहणार नाही.
४) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा/वस्तू विक्री / सेवा करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती असेल,
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला विक्री, औषध बिक्री, दवाखाने, दुध विक्री, रेशन दुकाने, इ.) सकाळी ०९.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत उघडी राहतील.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काय राहतील नियम व अटी
१) घराबाहेरील व्यायाम:
वैयक्तिक व्यायाम जसे सायकलींग, जॉगिंग, धावणे, चालणे या बाबी सार्वजनिक मोकळ्या जागा जसे खाजगी/सार्वजनिक मैदाने, पुणे महापालिकेची मैदाने/सोसायटीची मैदाने, या ठिकाणी खालील अटींच्या अधीन राहून करता येईल. मात्र कोणतीही क्रिया क्रीडांगणाच्या बंदिस्त भागात केली जाणार नाही. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यायामाची उपकरणे/ओपन जिम ई.वापर करता येणार नाही. वरील नमूद सुविधा पहाटे ०५.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत वापरता येतील. तसेच वरील सर्व कार्य सामुदायिक स्वरूपात करता येणार नाही. तथापि मुलांच्या सोबत मोठी व्यक्ती असणे आवश्यक राहील. नागरिकांनी केवळ शारीरिक व्यायाम करण्याकरिता थोड्या वेळा करिताच घराच्या बाहेर जावे. वरील नमूद वैयक्तिक व्यायाम करण्या शिवाय अन्य कोणत्याही बाबी यांना परवानगी नसेल.
२) स्वयं रोजगार करणाऱ्या व्यक्ती जसे प्लंबर, विद्युत विषयक काम करणारे, पेस्ट कंट्रोल आणि अन्य तांत्रिक स्वरूपाचे व्यवसाय करणारे व्यक्ती सामाजिक सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर करून काम करू शकतात,
३) नागरिक आपले बाहने वाहन दुरुस्ती करणारे गॅरेज यांची पूर्व नियोजित निश्चित करून घेऊन जाऊ शकतात.
४) शासकीय कार्यालय :
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये (आरोग्य व वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, राष्ट्रीय माहिती केंद्र, अन्न व नागरी पुरवठा, फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया, नेहरू युवा केंद्र, महापालिका सेवा त्यांना आवश्यक असेल त्या कर्मचारी संख्या वर काम करतील) १५% किवा जास्तीत जास्त १५ कर्मचारी या पैकी जी संख्या जास्त असेल ती वापरून कार्यालये सुरु ठेवता येईल.
५) दुकानांबाबत:
• मॉल व व्यापारी संकुल वगळता सर्व व्यापारी क्षेत्रे, रस्त्यावरील दुकाने आळीपाळीने (P-1,P-2 पद्धतीने) मुख्य रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम दिनांकाच्या दिवशी व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम दिनांकाच्या दिवशी पुढील नियमाप्रमाणे उघडतील. मुख्य रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम दिनांकास आणि मुख्य रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास रस्त्याच्या पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास तर पश्चिम बाजूकडील दुकाने विषम दिनांकास उघडी राहतील.
• पुणे शहरातील मनपाच्या मंडई मधील सम क्रमांकाचे गाळे सम दिनांकास तर विषम क्रमांकाचे गाळे विषम दिनांकास उघडी राहतील.
• वर नमूद केलेले व्यवसाय हे सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत खालील अटींच्या अधीन राहून खुली राहतील.
> दुकानामधील ट्रायल रूमचा वापर करता येणार नाही. त्याच प्रमाणे विक्री केलेले कपडे बदलून अथवा परत करता येणार नाही, जेणे करून संसर्गाचा प्रसार होणार नाही.
> दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ नये व सुरक्षित अंतर राहावे याची जबाबदारी दुकानदाराची राहील. तसेच गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांना उभे राहण्याच्या जागेवर ६ फुट अंतराच्या खुणा करणे, टोकन पद्धतीचा अवलंब करणे, किवा साहित्याचा घरपोच पुरवठा करू शकतात.
> नागरिकांनी खरेदीसाठी दुकानामध्ये शक्यतोवर घराच्या जवळील दुकानामध्ये जावे. जात असताना शक्यतो पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. बिगर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लांबवर जाऊ नये.
> दुकानांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास तात्काळ सदरची दुकाने बंद केली जातील.
खालील गोष्टी बंद राहतील
१) शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या, ई.
२) सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे नाट्यगृहे, या अनुषंगिक ठिकाणे.
३) सामाजिक | राजकीय । क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी.
४) सर्वसामान्य व्यक्ती साठी असलेली धार्मिक स्थळे.
५) स्पा.
६) मॉल, हॉटेल, उपाहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाऱ्या सेवा,
न्यूज अनकट प्रतिनिधी