‘पुढचा नंबर तुमचा’, हॅरी पॉटरच्या लेखिकेने सलमान रश्दीला पाठिंबा दिल्यानं धमकी

यूएस, १४ ऑगस्ट २०२२: लेखिका सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केल्यानंतर अनेक लोक या घटनेचा निषेध करत आहेत. हॅरी पॉटरच्या लेखिका जेके रोलिंग यांनीही ट्विटद्वारे सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. सलमान रश्दी यांना पाठिंबा देत ट्विट केल्याबद्दल आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

जेके रोलिंग यांना मिळाल्या धमक्या

जेके रोलिंग ५७ वर्षांच्या आहेत. रोलिंग यांनी ट्विटरवर वापरकर्त्याच्या धमकीच्या संदेशाचे स्क्रीनशॉट शेअर केले. वास्तविक, रोलिंग यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ट्विटरवर लिहिले होते की, अशा घटनेमुळे मी खूप दुःखी आहे. त्यांनी सलमान रश्दी यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचा आहे.

धमकीचे ट्विट शेअर करताना रोलिंग यांनी ट्विटरवर त्यांच्या संतापावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटरला टॅग करत त्यांनी लिहिले – ही तुमची मार्गदर्शक तत्त्वे आहेत का? त्यांनी पुढे लिहिले – तुम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा लोकांविरुद्ध हिंसाचाराची धमकी देऊ शकत नाही. आम्ही हिंसेचे गौरव करण्यास देखील मनाई करतो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या ट्विटर हँडलवरून रोलिंग यांना धमकी देण्यात आली आहे, त्याने सलमान रश्दीवर हल्ला करणाऱ्या हादीचेही कौतुक केले आहे. सलमान रश्दी यांच्यावर २४ वर्षीय हादीने हल्ला केला होता. हल्लेखोर मूळचा लेबनॉनचा आहे. जेव्हा सलमान रश्दी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि ते स्टेजवर पोहोचले तेव्हा हादीने त्यांच्यावर चाकूने वार केले. सध्या लेखकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, हल्लेखोराला चौटौका काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

कशी आहे सलमान रश्दींची प्रकृती?

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीबाबत बोलायचं झालं तर त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून घेण्यात आला आहे. त्यांचे यकृत खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या एका डोळ्यालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा