पुणे, 20 डिसेंबर 2021: अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पबचत गटाच्या प्रतिनिधी संघाचे ३० वे वार्षिक अधिवेशन पुण्यात संपन्न झाले. या अधिवेशनात अमृतसर, जम्मू काश्मिर, तामिळनाडू अशा भारतातल्या अनेक प्रांतातून एजंट प्रतिनिधींनी हजेरी लावली. देशाच्या आर्थिक विकासात या महिला एजंट यांचा मोलाचा वाटा आहे. देशभरातून सुमारे पाच लाख एजंट कार्यरत असून घरोघरी फिरुन त्या रक्कम जमा करतात. विधवा, परित्यक्ता यांना उपजिविकेचे साधन या सामाजिक उपक्रमातून मिळाले आहे.
या अधिवेशनात संपूर्ण देशातून ३० प्रांताचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना महासंघाच्या अध्यक्षा राजश्री भगत यांनी सांगितले, की या सरकारमान्य सेवांमुंळे महिलांना सक्षम , स्वकर्तृत्वान होण्याची संधी मिळाली आहे. अनेक वेळा झगडून सरकारला या योजनांच् महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. ते कार्य आम्ही मनापासून १९७२ पासून करत आहोत. यावेळी अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी चित्रफितीदवारे शुभेच्छा पाठवल्या आणि असे कार्य करत राहण्यासाठी तत्परता दाखवण्याचा संदेश दिला. यावेळी महासंघांचे संयुक्त आयुक्त मीर अजमतअली यांच्या हस्ते राजश्री भगत यांना आणि या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एजंट यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक पवन गुप्ता यांनी केले तर कौस्तुभ ठकार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
न्युज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस