तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातसाठी पुढील तीन दिवस महत्वाचे

मुंबई, १७ मे २०२१: चक्रीवादळ तौत्के आणखी ताकदवर होत चाललं आहे. केरळ, गुजरात आणि महाराष्ट्र समवेत पाच राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रावर तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस देखील झाला आहे. गोव्यामध्ये देखील या चक्रीवादळानं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीवर धडकलं आहे ज्यामुळं गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

दुसरीकडे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तौत्के वादळासंदर्भात बजावलेल्या चेतावनी च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यां समवेत तातडीची बैठक बोलावली आणि आपत्तीच्या या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती घेतली. वादळाची शक्यता लक्षात घेता गुजरातमध्ये हाय अलर्ट सुरू आहे. सुरत जिल्ह्यातील ४० आणि ओलापड तहसीलच्या २८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

हे चक्रीवादळ मुंबईतूनही जाणे अपेक्षित आहे. हे लक्षात घेता बीएमसी’नं शेकडो कोविड रुग्णांना सुरक्षित ठिकाणी पाठवलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसीमधून २४३, दहिसरमधून १८३ आणि मुलुंडमधून १५४ रुग्णांना बाहेर काढण्यात आलंय. वादळामुळं हवामान खात्यानं ताशी ६०-८० किमी वेगानं वारं वाहण्याची चितामणी जारी केली आहे.

महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात साठी पुढील तीन दिवस महत्वाचे

हवामान विभाग (आयएमडी) च्या मते, असं सांगितलं जात आहे की, चक्रवाती वादळ गुजरातमधील वेरावळ ते पोरबंदर दरम्यान मंगरोलजवळील किनाऱ्यावर येईल. या वादळाचा परिणाम तीन दिवस महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातच्या किनारपट्टीवर अपेक्षित आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की तौत्के वादळाच्या वेळी, ताशी १५० ते १६० किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात.

आयएमडीनं सांगितलं की, १७ मे रोजी मुंबईसह उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडंल. वादळाचा धोका पाहून पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी बचाव आणि मदत आणि लोकांच्या संरक्षणाची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन दिवसांत तौत्के चक्रीवादळ केरळ, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रासाठी मोठी समस्या बनू शकतं. त्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना सतर्क केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा