नागपूर जिल्ह्यात महिनाभरात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली, विषाणूजन्य आजार-टायफॉइडने केला कहर

8

नागपूर, २६ जुलै २०२३ : पावसामुळे शहरासह जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. व्हायरल इन्फेक्शन, डायरिया, डेंग्यूसोबतच टायफॉइडची दहशत निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळलेले, सध्या त्यांची संख्या दुप्पट म्हणजे ८२ पर्यंत वाढली आहे. यातील काही रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. तर काही रुग्ण बरे झाल्यानंतर घरीच उपचार घेत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

यावेळी पावसाची संततधार नाही. एक दिवस पाऊस पडल्यानंतर २-३ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरत नाही. यासोबतच डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. दमटपणामुळे अतिसार, व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरत आहे. त्याचबरोबर डोळ्यांचे आजारही झपाट्याने वाढले आहेत. या आजारांचा सहज प्रसार एकापासून दुसऱ्यामध्ये होत असल्याने अधिकाधिक लोकांना याची लागण होत आहे. सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. मेडिकलमध्ये दररोज १०० तर मेयो रुग्णालयात ६० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे.

आतापर्यंत शहरात डेंग्यूमुळे सुमारे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३-४ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असल्याने महापालिकेकडे नोंदणी झालेली नाही, तर आजाराची नोंद महापालिकेकडे असणे आवश्यक आहे असे प्रशासनाने कळवले. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकूण ३३ रुग्ण आढळून आले असून, सध्या त्यांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात वाढतात. यामुळेच ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, तिथे डासांची वाढ होण्याची दाट शक्यता असून महापालिकेकडून घरांमधील कुलरच्या पाण्यासह भांड्यांमध्ये साठलेल्या पाण्याची तपासणी केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा