रमाई आवास योजनेंतर्गत नगरमधील २६६२ कुटुंबांना मिळणार घरटं !

नगर, २६ जुलै २०२३ : रमाई आवास योजनेतून राज्यात ग्रामीण व शहरी भागातील तब्बल १ लाख ५२ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय उद्दिष्ट्ये ठरवले असून, नगर जिल्ह्यात रमाई आवासमधून २६६२ घरकुले मंजूर झालेली आहेत. जिल्हा परिषद स्तरावरुन लवकरच तालुकानिहाय उद्दिष्ट्ये दिली जाणार आहेत.

शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षसाठीचे घरकुल उद्दिष्ट नुकतेच जिल्हानिहाय वितरित करण्यात आले आहे. जिल्हानिहाय समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी १ लाख ५२ हजार ४३५ लाभार्थ्यांची आकडेवारी, आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे दिली होती. शासनाने १०० टक्के उद्दिष्टास मंजुरी प्रदान केलेली आहे.

१ लाख ३४ हजार १७४ घरकुले ही ग्रामीण भागात तर १८२६१ शहरी भागात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायती हद्दीतील लाभार्थ्यांसाठी मंजुर करण्यात आलेली आहेत. या संदर्भाचे तसे पत्र अप्पर सचिव श्री आहिरे यांनी काढले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा