मुंबई, ११ जून २०२१: राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.
महाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे.
दिवसभरात १२,२०७ नवीन रुग्णांची वाढ
राज्यात काल १२,२०७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व काल नवीन ११,४४९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५६,०८,७५३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,६०,६९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.४५ झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे