येणाऱ्या काळात भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढणार: गुलेरिया

नवी दिल्ली, दि.८मे २०२०: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५०हजारावर पोहोचली आहे.मात्र ही आकडेवारी कमी होईल असे सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत “एम्स”चे अधीक्षक रणदीप गुलेरिया यांनी एका धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. त्यांनी असे म्हंटले आहे की, येत्या जुन जुलैमध्ये कोरोनाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यामुळे भारतीयांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता भारतीय जनता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

याबाबत गुलेरिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही मॉडेलिंग डेटासोबत सर्वे केला आहे की, भारत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या येणाऱ्या काळात म्हणजे जून, जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ही संख्या वाढीला अनेक पैलू असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

त्यामुळे भारताने अधिक अलर्ट राहणे आता गरजेचे आहे.आणि या गोष्टीचा वेळोवेळी आपल्याला अंदाज येत राहील. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा