मुंबई, १९ नोव्हेंबर २०२० : राज्यातले कोविड १९ च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या कालही नव्या बाधितांच्या संख्ये पेक्षा दुप्पट होती काल ६१२३ रुग्ण बरे झाले तर २८४० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आता पर्यंतच्या कमदर बाधितांची संख्या आता १७ लाख ५२ हजार ५०९ झाली असून यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६ लाख २३ हजार ५०३ आहे.
सध्या राज्यात ८१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आता ९२.६४ शतांश टक्क्यांवर पोहोचलं असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण ४.६७ 4 शतांश टक्के आहे. काल राज्यात कोविड १९ च्या ६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या ४६,१०२ वर पोहोचली.
राज्यातला मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. गेले कित्येक दिवस त्यात घट झालेली नाही. राज्यात आतापर्यंत केलेल्या कोरोना चाण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण १७.८ दशांश टक्के आहे. ते सप्टेबर पेक्षा जवळपास ५ टक्क्यांनी कमी असलं तरी राष्ट्रीय सरासरी पेक्षा बरंच जास्त आहे. देशात हे प्रमाण ७.०१ शतांश टक्के आहे.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही राष्ट्रीय सरासरी पेक्षा ७८ शतांश टक्क्यानी कमी आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा ४५ शतांश टक्क्यांनी कमी असलं तरी यात समाधान मानण्यात अर्थ नाही कारण राज्यातला मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा १.१६ शतांश टक्क्यांनी जास्त आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: