गुईलेन बॅरे सिंड्रोम रुग्णाची संख्या 59 वर ; एकट्या पुणे शहरात 56 रुग्णांची नोंद.!

49

23 जानेवारी 2025 पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांचा पुणे शहरात फैलाव दिवसेंदिवस वाढत असून लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. त्यातील ५६ रुग्ण एकट्या पुण्यात सापडले आहे. दूषित पाणी अथवा अन्नपदार्थातून हा संसर्ग होत असल्याने आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

पुण्यामध्ये सापडलेले रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातील आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांचा पिण्याचा पाण्याचा स्रोत एकच होता का ? त्यांनी एकच ठिकाणाहून अन्नपदार्थ खाल्ले होते का याचा सुद्धा आरोग्य विभाग शोध घेत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. कोविड सारखाच हा आजार आहे का ? किंवा याची लक्षणे नेमकी काय व हा कोणाला होतो या प्रश्नच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोम काय आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजारात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच प्रतिकारशक्तीच्या विरोधात काम करायला लागते त्यामुळे या आजाराला ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हटले जाते. ज्यामुळे आपल शरीर कमजोर व्हायला लागते आणि हातापायाला झिणझिण्या येयला लागतात त्यानंतर हा आजार संपूर्ण शरीरात पसरतो. सुरुवातीला जेव्हा एखाद्या रुग्णाला याची लागण होते, तेव्हा प्रथम रुग्णाला श्वसनासंबंधी समस्या जाणवतात. त्यानंतर संपूर्ण शरीरात अशक्तपना जाणवतो मात्र, वेळीच या आजारावर उपाय घेतले नाही तर रुग्णाला काही वेळासाठी व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवाव लागत.

लक्षण :

१) श्वास घेण्यास अडथळे
२) हातापायांना मुंग्या येतात
३) ब्लड प्रेशरची समस्या जाणवते
४) हात, पाय, डोळे आणि तोंड या भागात अशक्तपणा जाणवतो
५)चालण्यात किंवा पायऱ्या चढण्यात अडचणी
६)अन्नपदार्थ गिळण्यास अडथळा
७) पोट दुखी

काय कारण :

या आजाराच नेमके कारण अजून पर्यंत समजू शकलेल नाहीये याबाबत रिसर्च चालूच आहे हा आजार व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो असे वैज्ञानिकांचे मत आहे.

कोणाला जास्त धोका :

हा आजरा वयोवृध्द व्यक्तींना होतो ज्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात, ५० वर्ष किंवा त्यावरील वरच्या वयोगटातील व्यक्तींना जास्त लवकर होण्याची शक्यता सांगितली जातं आहे.

अशी घ्याल काळजी :

१) पाणी उकळून प्या
२) फळभाज्या खाण्याआधी धूवन खा
३) चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा
४) जेवणाआधी आणि स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा
५) कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा
६) बाहेरचे खाणे टाळा
७) वर्क आऊट आणि मिडीटेशन करा

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा