नाशिक, १९ जानेवारी २०२३ : डिसेबर महिन्यात शहरातील एकूण २२ रुग्णांपैकी ६ रुग्ण एकट्या जुन्या नाशिकमधील मुलतानपुरा भागात आढळून आल्याची माहिती मनपाकडून जाहीर करण्यात आली व मनपाने हा भाग गोवर उद्रेक म्हणून घोषितही केला; मात्र याच भागात रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. जुने नाशिक हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग असून, या भागात महापालिकेकडून नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
गोवरचा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या नाक आणि घशाच्या शलेष्मामध्ये वाढतो आणि हा रोग खोकला, श्वासोच्छ्वास आणि शिंकणे याद्वारे इतर लोकांमध्ये पसरतो. जास्त ताप, अशक्तपणा, खोकला, घसा खवखवणे, स्नायू वेदना ही लक्षणे आढळून येतात.
जर तुम्हाला किंव्हा तुमच्या मुलाला गोवरचा संसर्ग झाला असेल, तर तुमच्या प्राथमिक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क टाळा, भरपूर विश्रांती घ्या, संसर्ग झाल्यास लस घ्या. नाक ओले करण्यासाठी खारट अनुनासिक फवारण्या वापरा असे आव्हान नाशिक महापालिकेने केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर