विरोधकांनी गाजवले अधिवेशन, विरोधक-सत्ताधारी यांच्यात राडा

मुंबई, २४ ऑगस्ट २०२२: खरं तर अधिवेशन म्हणजे शाब्दिक मारामारी. पण आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक आणि शारीरिक मारामारी झाली आणि विरोधकांनी अधिवेशनाचा पाचवा दिवस गाजवला.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक विविध घोषणांमुळे चर्चेत आहे. पन्नास खोके, एकदम ओके, या घोषणेने अधिवेशनाची सुरुवात झाली. त्याचाच परिणाम म्हणून आज अखेर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अखेर जुंपली. अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात आज धक्काबुक्की झाली आणि अखेर या अधिवेशनाला काळा डाग लागला.

आज अमोल मिटकरी यांनी विधानभवनाच्या बाहेर सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. त्यांनी केलेल्या घोषणा सत्ताधाऱ्यांना झोंबल्या. त्यामुळे विधानपरिषदेच्या आवारात महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक आणि शारिरीक मारामारी झाल्यामुळे आता अधिवेशन गाजले, असं म्हणायला हरकत नाही.

यावर विरोधक अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांच्या विरोधात धक्काबुकीनंतर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्हाला मारुन टाकायचं आहे का? आम्हाला शिवीगाळ केली जातेय. तसेच आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचं अनोल मिटकरींनी सांगितलं.

खोक्यांवरुन यंदा राजकारण गाजलं आहे, तर यावर सत्ताधाऱ्यांकडून मात्र आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. तुम्ही सीसीटीव्ही तपासून पहा. तुम्हाला कळेल सुरुवात कोणी केली. असे म्हणत आपल्यावरचा आरोप झटकून टाकण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईक यांनी केला.

आजचा प्रकार हा महाराष्ट्रासाठी न शोभणारा असल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली. तर महेश शिंदेंनी यावर प्रत्युत्तर देत सांगितलं की, ठाकरे गटाने अडीच वर्षात अर्थखातं धुऊन खाल्लं. तर मिटकरी हा राजकारणातला काळा डाग असं म्हणत त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

एकुणातच अधिवेशन शेवटापर्यंत आल्यानंतर आता अधिवेशनाला गालबोट लागलंय. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातल्या या धक्काबुक्कीने एकमेकांवरचे कडवे प्रेमच समोर आले आहे. आता उरलेल्या दोन दिवस अधिवेशनात काय घडतयं? हे पहाणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा