बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरूनच आले होते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई २७ जून २०२३ : बांद्रातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेवर नुकताच हातोडा चालवण्यात आला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हातोडा मारण्याचे आदेश वर्षा वरून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या आदेशानंतर बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला हातोडे मारणारे निर्लज्ज आणि नीच आहेत, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. तर बाळासाहेबांसाठी अनेक खटले अंगावर घेऊ, असे म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात आहेत. कुणाच्या फोटोला हातोडे मारतोय हेदेखीलया दिवट्यांना कळत नाही. हे कसले शिवसैनिक?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे. यांनी शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. त्यांना तो अधिकार नाही. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवणारे हे लोक नकली आणि ड्युप्लिकेटच आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण जगलात, वाढलात, मोठे झालात. त्यांच्याच नावावर राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यांच्या फोटोवर हातोडा चालवण्याचे आदेश देता? तुम्हाला काहीच वाटत नाही?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, केसीआर मोठा ताफा घेऊन आले आहेत. जेवणावळी झाल्या. पंढरपुरात दर्शन झाले. हे शक्ती प्रदर्शन तुम्ही कुणाला दाखवत आहात?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.तुमचा पक्ष तेलंगणामधला आहे. आपण महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटला आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा