मुंबई, २९ ऑगस्ट २०२२: राज्यातला सुप्रीम कोर्टातला सत्तासंघर्ष दीर्घकाळ चालेल असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात येत आहे. या सत्तासंघर्षाचा निकाल किमान ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या ज्या परस्पर विरोधी याचिकांची केस आता घटनापीठासमोर गेली आहे. तारीख पे तारीख मिळणार आणि हा निकाल पुढची चार ते पाच वर्षे लागणार नाही, असं भाकित गोगावले यांनी केलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. त्या नंतर तर दुसरीकडे शिवसनेने बंडखोर ४० आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेच्या याचिकेवर गेल्या दोन महिन्यापासून सुनावणी सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने हे प्रकरण घटना पीठाकडे दिले आहे. आता या पुढील सुनावणी घटनापीठ घेणार आहे.
भरत गोगावले एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की आम्ही मूळचे शिवसैनिक. ७ तारखेला निर्णय कळेल, धनुष्यबाण आमचा आहे. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. आता १२ तारीख आली. ४ ते ५ वर्ष हे चालेल. दुसरी निवडणूकही २०२४ ची आपण जिंकू…. असे ते म्हणाले
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव