केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ: डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी, दि.१६ मे २०२०: कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणातही उपाय अद्याप केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन काढला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच केंद्राने जाहीर केले हे पॅकेज नुसता आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या ‘कोविड १९ वॉर रुम’ ला खासदार डॉ. कोल्हे यांनी शुक्रवारी ( दि.१५)रोजी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी डॉ.कोल्हे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक तपासण्या वाढविण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला थांबविण्याचा एकमेव पर्याय नाही, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे.
लॉकडाऊन वाढणे हे देशाच्या आणि राज्याच्या हिताचे अजिबात नाही. सध्या केंद्राकडून येणाऱ्या सूचना आणि आदेशांचा गोंधळ सुरू आहे. त्याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.

या पॅकेजचा थेट किती लाभ मिळणार याबाबत केंद्राकडून कोणतीही स्पष्टता नाही, आपण केंद्राच्या समितीला प्रमुख सहा सूचना केल्या होत्या. त्यापैकी स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडून अन्य विषयांवर कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा