टी -20 WC मध्ये सहभागी संघ होणार मालामाल, विजेते आणि उपविजेत्यांना मिळणार एवढी रक्कम

पुणे, 11 ऑक्टोंबर 2021: टी 20 विश्वचषक आयपीएल 2021 नंतर लगेच सुरू होणार आहे.  यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज आहेत.  दरम्यान, रविवारी आयसीसीने विश्वचषक विजेत्याला मिळणारी रक्कमही जाहीर केली.
 या वर्षी टी -20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 मिलियन डॉलर (सुमारे 12 कोटी रुपये), तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर (सुमारे 6 कोटी रुपये) मिळतील.  एवढेच नाही तर उपांत्य फेरीत जे दोन संघ पराभूत होतील, त्यांना आयसीसीकडून 4 लाख डॉलर (सुमारे 3 कोटी रुपये) दिले जातील.
कोणाला किती बक्षीस मिळेल?  (भारतीय रुपयामध्ये)
 • विश्वचषक विजेता – 12 कोटी रुपये
 • विश्वचषक उपविजेता-6 कोटी रुपये
 • उपांत्य फेरी – 3 कोटी रुपये
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण स्पर्धेसाठी एकूण 5.6 मिलियन डॉलर रक्कम ठेवण्यात आली आहे, जी सर्व 16 संघांमध्ये वितरित केली जाईल.
 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाव्यतिरिक्त, सहभागी संघ आणि सुपर 12 स्टेज जिंकणाऱ्या संघांनाही आयसीसीकडून पुरस्कृत केले जाईल.  सुपर 12 मध्ये एकूण 30 सामने होणार आहेत, त्यामुळे येथे जिंकणाऱ्या संघांना 40 हजार डॉलर्सची रक्कमही दिली जाईल.  जे संघ सुपर 12 च्या पुढे जाऊ शकणार नाहीत, त्यांना 70 हजार डॉलर्स रोख दिले जातील.
 जे संघ सुपर 12 चा भाग नाहीत आणि फक्त 1 फेरीत खेळत आहेत, त्यांना प्रत्येक विजयासाठी 40 हजार डॉलर्स दिले जातील.  फेरी 1 मधून बाहेर पडणाऱ्या चार संघांना 40 हजार डॉलर्सही मिळतील.
फेरी 1 मध्ये सहभागी संघ: बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू जेनुआ, स्कॉटलंड, श्रीलंका
 सुपर 12 साठी 8 संघांची पुष्टी: अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज
  यासह, सामन्यांच्या दरम्यान दोनदा ‘ड्रिक्स ब्रेक’ असेल.  हे ब्रेक डावाच्या मध्यभागी घेतले जातील आणि  अडीच मिनिटे असतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा