Rutuja Patil Meets Jay Pawar Family : पवार कुटुंबात जरा काही झाल तर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण येते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह फलटणचे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे. येत्या १० एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असून शरद पवार यांना या सोहळ्याच निमंत्रण देण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जय आणि ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय जय पवार यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीसह शरद पवारांची सुद्धा भेट घेतली. त्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत.


या अगोदर सुद्धा आपण पाहिले असेल की, सणाच्या किंवा घरच्या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आले आहेत. बऱ्याचदा अजित पवार दिवाळीच्या निमित्ताने शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत. यातच आता १० एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा होणार आहे. यासाठी शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून लग्नसोहळ्यात संपूर्ण पवार कुटूंब एकत्रित दिसणार आहे. मागील काही दिवसांपासून आपण अजित पवार आणि शरद पवार यांना एकमेकांचे विरोधक असल्याचे चित्र पाहीले आहे. पण कौटुंबिक सोहळ्यात ते पुन्हा एकत्रित दिसणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर