मुंबई, १४ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नारायण सोनी असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा आहे. नारायण सोनीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी IPC च्या कलम २९४, ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सोनी हा मनोरुग्ण असून तो दहा वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचे बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. पत्नीने नारायण सोनीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लगीनगाठ देखील बांधली.
- पवारांनी मध्यस्थी न केल्याचा आरोप
दरम्यान, शरद पवारांनी पती-पत्नीच्या भांडणाप्रकरणात काहीही कारवाई केली नसल्याचा राग नारायण सोनीच्या मनात होता. त्यातूनच त्याने शरद पवारांना धमकी दिल्याची माहिती आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.