द फिलिपिन्स देश भारतासाठी महत्त्वाचा का आहे?
नुकतेच भारताचे पंतप्रधान दोन देशांच्या यात्रेवर गेले आहेत. यामध्ये पहिला देश आहे फिलिपिन्स आणि दुसरा देश आहे जपान. जपान विषयी आपण दुसऱ्या लेखांमध्ये समजून घेऊयात. या लेखात आपण फिलिपिन्स विषयी जाणून घेऊयात. फिलिपिन्स भेटीत राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. जसे की मेरीटएरियंस डोमेन, सेक्युरिटी टुरिझम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती अश्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वात आधी तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला असेल की फिलिपिन्स चे एवढे महत्व का आहे. फिलिपिन्स हा एक आशियान देश आहे (असोसिएशन ऑफ साऊथ एशियन कंट्रीज) आशिया देशांमध्ये दहा देश आहे त्यात फिलिपिन्स हा एक देश आहे खूपच महत्त्वाचा देश आहे फिलिपिन्स आशियामध्ये आणि याची राजधानी आहे मनिला.
फिलिपिन्स हा लोकसंख्येच्या बाबतीत एक मोठा देश आहे. याची लोकसंख्या दहा ते अकरा करोड एवढी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगात फिलिपिन्स बाराव्या या स्थानावर आहे. परंतु या देशाची सैन्य ताकद तुलनेत कमी आहे हा देश डिफेन्स वर फारसा खर्च करत नाही. याचे कारण असे आहे की ग्लोबल फायर इंडेक्स मध्ये फिलिपिन्स ६४ व्या स्थानावर आहे. हे स्थान इराक, कुवेत यांच्या तुलनेत कमी आहे. यांच्या तुलनेत भारताचे स्थान सैन्या ताकदीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.
फिलिपिन्समध्ये महत्त्वाच्या बँकेचे मुख्यालय आहे हे बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक. या बँकेकडून चायना, भारत आणि पाकिस्तान व इतर यासारखे अनेक देश कर्ज घेत असतात. याचा अर्थ असा नाही होत की फिलिपिन्स आहे एक आर्थिक दृष्ट्या मोठा देश आहे कारण तिथे एशियन डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय आहे आणि एशियन डेवलपमेंट बँकेला संचलित करत आहे. फक्त एवढेच आहे की एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय तिथे आहे. याव्यतिरिक्त या देशाची अर्थव्यवस्था एवढी मोठी नाहीये की या बँकेच्या कामकाजावर या देशाचा प्रभाव पडेल. या बँकेला प्राथमिकत: अमेरिका आणि जपान चालवतात.
फोन करा मला या देशाचे चलन पेसो आहे भारतीय चलन आणि फिलिपिन्स चे चलन यात फारसे अंतर नाही. फिलिपिन्स ची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या घटकांवर अवलंबून आहे याव्यतिरिक्त त्यांच्याकडे निर्यात करण्यासारखे महत्वाचे साधन नाही.
इथे एक बाब आहे हे ही चीन ठाणे फिलिपिन्स यांच्यामध्ये सीमावाद आहे फिलिपिन्सच्या मते मेडिटरेनियन सीमा फिलिपिन्सच्या आहे आणि चीन चे मत आहे के साउथ चायना सी हा भाग चीनचा आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये फिलिपिन्स आणि चीन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे येथे प्रामुख्याने दोन देशांना फायदा होत आहे ते म्हणजे भारत आणि जपान.
फिलिपिन्स भारतासाठी एवढा महत्त्वाचा का आहे याचे पहिले कारण भारत आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये असलेला व्यापाराची वाढण्याची शक्यता आहे तसेच याला पूरक असा दोन्ही देशांमध्ये झालेला फ्री ट्रेड एग्रीमेंट जो करार भारत आणि अशियन देशांमध्ये २००९, २०१० यादरम्यान झाला होता. फिलिपिन्स आणि भारत यांच्यामध्ये असलेला व्यापार दोन बिलियनडॉलर्स च्या आसपास आहे. भविष्यात हा व्यापार वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात हा व्यापार पाच ते सहा बिलियन डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दुसरा मुद्दा असा आहे की भौगोलिक परिस्थिती, फिलिपिन्स चे भौगोलिक खान असे आहे की भारत त् चीनवर दबाव आणू शकतो. तसेच अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये सुरक्षा कराल देखील आहे अमेरिकेचे फिलिपिन्समध्ये सैन्य ठिकाणे सुद्धा आहेत. अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्यातील सुरक्षा करारानुसार जर फिलिपिन्स वर हल्ला झाला तर अमेरिका फिलिपीन्स ची मदत करणार. सध्याच्या काळात अमेरिका भारताचा मित्र देश म्हणून वर येत आहे आणि या सहयोगाने भारत अमेरिकेच्या मार्फत फिलिपिन्सला सीमा सुरक्षिततेच्या बाबतीत मदत करू शकतो.
आपण असं म्हणू शकतो की भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या भेटीत भारत आपले महत्व फिलिपिन्समधील लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे तिथल्या जनतेचा विश्वास जगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच प्राचीन भारत आणि प्राचीन फिलिपिन्स यांच्यातील जे लोक होते त्यांचे घनिष्ट संबंध होते. फिलिपिन्स मध्ये जी भाषा बोलली जाते तागलोग भाषेमध्ये तीस टक्के शब्द हे संस्कृत भाषेतून घेतले गेले आहेत. फिलिपिन्समध्ये जेव्हा जेव्हा पुरातत्व खोदकाम झाले त्यामध्ये भारतीय संस्कृतीशी निगडीत आणि संस्कृत भाषा असलेल्या वस्तू सापडत आहेत. याचा अर्थ असा की भारत आणि फिलिपिन्स यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते आणि हे लक्षात घेऊन राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींना तारा देवीची मूर्ती भेट दिली आहे. हे एक दोन्ही देशांमधील असलेले घनिष्ठ सांस्कृतिक संबंध दर्शवतात.
— ईश्वर वाघमारे