खलिस्तानी संघटनेने रचला कट ……

नवी दिल्ली, २७ जानेवारी २०२१: दिल्लीत कृषी विधेयक कायदा वरून शेतकरी गेले अनेक महिने आंदोलन करत आहे. ना ऊन, वारा, पाऊस कश्याची पर्वा न करता कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने शेतकऱ्यांचे नाव खराब झाले आहे. पण, आता याच हिंसकते बाबत काँग्रेस ने गंभीर आरोप केले आहेत.

शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा कट हा शीख फाॅर जस्टिट या संघटनेने रचला असा आरोप रवनीत सिंह बिट्टू यांनी केला आहे आणि त्या पाठोपाठ त्यांनी आभिनेता दीप सुदवर आरोप करत या कटामध्ये त्याचा हात आसल्याचे आरोप केले आहेत. तसेच धार्मिक ध्वज हा केशरी आसतो, पिवळा नसतो, असे सांगत त्यांनी लाल किल्ल्यावर फडकवलेल्या ध्वजावर मोठे विधान केले.

मात्र, रवनीत सिंह बिट्टूंच्या विधानमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तर काल झालेल्या हिंसाचारात पोलिस आणि शेतकर्यांमधे झडप पहायला मिळाली. ज्यामधे अनेक पोलिसकर्मी जखमी झाले. तसेच या घटने पासून आत्तापर्यंत दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण असून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्री अमित शाहंच्या सुरक्षतेमधे वाढ करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा