सोशल मीडियाची ताकद – “बाबा का धाबा” सोशल मीडियावर ट्रेडींगला

दिल्ली, ८ ऑक्टोबर २०२०: काल सोशल मीडियावर एका युट्युबरने वयोवृध्द दाम्पत्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये वयोवृद्ध व्यक्ती सांगत असतो की, त्याचा दिल्लीमधील मालवीय नगर मध्ये एक धाबा आहे. परंतु ग्राहक नसल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे अश्रू पाहून व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

कित्येक लोकांनी सोशल मीडियावर ‘बाबा का धाबा’ येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आजचा दिवस उजाडला आणि जणू चमत्कारच झाला. दिल्लीतील अनेक लोकांनी त्यांच्या धाब्यावर प्रचंड मोठी गर्दी केली होती. याच कारणास्तव या वयोवृद्ध दाम्पत्याला आनंदाश्रू अनावर झाले.  सोशल मीडियावर ही व्हिडिओ व्हायरल होताच अनेक लोकांनी तेथे हजेरी लावली. अशातच आम आदमी पार्टीचे पूर्व विधायक सोमनाथ भारती यांनी ही बाबा का धाबा याचा आस्वाद घेतला. आणि इतकचं नाही तर त्यांनी ट्विटर ट्विट ही केले. त्यात ते म्हणाले, “दिल्लीवाल्यांनो मालवीया नगर मधील  बाबा का धाबा वर जायला विसरू नका”. सोशल मीडिया ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.

बाबा का धाबा चालवणाऱ्या वयोवृध्द व्यक्तीचे नाव कांता प्रसाद आणि पत्नीचे नाव बादामी देवी आहे. दोघेही जण मालवीय नगरमध्ये आपले छोटा धाबा चालवतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणीच मदत करत नाही .आणि संपूर्ण काम ते स्वतःच करतात. परंतु आता त्यांच्या कार्याला गती येणार हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा