दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूने खाल्ला भाव

20

बारामती, २४ ऑक्टोबर २०२० : बारामती शहरात आज दसऱ्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसली उद्या मानाच्या असणाऱ्या झेंडूच्या फुलांचा भाव चांगलाच वधारला होता, तो आज २०० रुपये किलो होता.मात्र तरी देखील आज बाजारात खरेदीसाठी नागरिकामध्ये बऱ्याच दिवसांनी उत्साह पाहायला मिळाला.

बारामती शहरातील बाजारपेठा आज दसऱ्याच्या खरेदीसाठी फुलून गेल्या होत्या दसऱ्याला मान असणारी झेंडूची फुले व आपट्याची पाने खरेदीसाठी गर्दी झाली होती मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठून राहिल्याने मोठे नुकसान होऊन सर्व पिके वाहून गेली.

यामध्ये लागवड केलेला झेंडू तर तयार झालेली झेंडूची फुले सडून गेली त्यामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी झाल्याने यंदा झेंडूने २०० रुपये किलो एवढा उच्चांकी दरात विक्री झाली झेंडूचा दर पाहता काही नागरिकांनी तयार हार खरेदीला प्राधान्य दिले कोरोना संसर्गाच्या धर्तीवर मागील अनेक सणवारांवर कोरोना संसर्गाचे सावट होते.आजच्या गर्दीमुळे जनजीवन परत एकदा सुरळीत होतानाचे चित्र पाहायला मिळाले.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा