मुंबई, २५ ऑक्टोंबर २०२०: साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. त्यामुळे दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव वाढलेला पाहायला मिळत आहे. सध्या दादर मार्केटमध्ये झेंडू १५० ते ३०० रुपये प्रती किलोने विकला जात आहे.
मुंबईप्रमाणेच नाशिकच्या बाजारातही फुलांचे दर वधाररले आहेत. नाशकात बाजारात नागिकांनी फुलं घेण्यासाठी मेठी गर्दी केली. नाशिकच्या बाजारात ६०० ते ७०० रुपये कॅरेटने फुलांची विक्री हेत आहे.
पुण्यातही घाऊक बाजारात एक किलो झेंडूला प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये असा भाव मिळाला, तर जुईच्या एका किलोस दोन हजार रुपये भाव मिळाला. तसेच गुरुवारी (ता. २२) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झेंडू, गुलछडी, शेवंतीच्या फुलांना मागणी वाढण्यास सुरुवात झाल्याने दर वाढले होते. या फुलांना अनुक्रमे प्रति किलोला ५० ते १००, २५० ते ३०० आणि १५० ते ३०० रुपये होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे