लखनऊ, ५ ऑगस्ट २०२०: आज अयोध्येत इतिहास रचला गेला आहे. अनेक वर्षांच्या कोर्टाच्या कार्यवाहीनंतर आज अयोध्येत राम मंदिराचा पाया घातला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले. पंतप्रधान म्हणाले की, राम मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. पंतप्रधान मोदींनी अयोध्येत हनुमानगढी येथे पूजा केली. त्यानंतर त्यांनी भगवान राम यांचे दर्शन घेतले. भूमिपूजना दरम्यान मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि इतर काही पाहुणे सहभागी झाले होते.
यावेळी आपल्या संविधानात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण आपापसातल्या प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनेने राम मंदिराला वापरल्या जाणा-या या शिलांना जोडले पाहिजे. आपण जेव्हा जेव्हा श्री राम यांना मानले तेव्हा तेव्हा आपली प्रगती झाली आहे व जेव्हा आपण प्रभू श्रीराम यांना विसरलो तेव्हा आपला विनाश झाला आहे. सर्वांच्या प्रयत्नाने आणि विश्वासानेच आपली प्रगती होणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रभू राम यांनी घालून दिलेल्या मर्यादेचा वापर करूनच आपल्याला विजय मिळवता येणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अयोध्येत उभारलेले राम मंदिर भारतीय संस्कृतीची झलक देईल, मानवतेला सदासर्वकाळ प्रेरणा देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी असे देखील उद्गार काढले की, सर्वांचे राम, सर्वांमध्ये राम आणि जय सीया राम… भगवान राम यांचे पाय जेथे जेथे पडले आहेत तेथे राम सर्किट तयार केली जात आहे. पंतप्रधान म्हणाले की धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की प्रभू श्रीराम सारखा आज पर्यंत कोणताही शासक होऊन गेलेला नाही. प्रभु श्रीराम यांनी कोणालाही उपाशी ठेवले नाही ना कोणाला गरीब होऊ दिले. स्त्री असो वा पुरूष सर्वांना समान वागणूक दिली.
एवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की प्रभु श्रीराम यांनी सांगितले आहे की लहान वृद्ध अनाथ यांची सेवा आपण केली पाहिजे यांची सेवा केली पाहिजे जे आपल्या कोरोना ने देखील शिकवले आहे. प्रभू श्री रामचंद्र यांनी असे सांगितले आहे की आपली मातृभूमी स्वर्गा पेक्षाही सुंदर असते. आपला देश जेवढा शक्तिशाली असेल तेवढीच देशामध्ये शांती असेल. रामाची हि निती आणि रीत वर्षानुवर्षे भारताला मार्ग दाखवत राहिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी